पार्थ सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,खरपुडी
येथील पार्थ सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे २२ वे वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. खरपुडी येथे शिस्त, शौर्य आणि देश प्रेमाच्या भावनेतून रुजत असलेल्या संस्काराचे दर्शन घडल्याने संपूर्ण परिसर भारावून गेला. शाळेतील एकूण ४७६ पैकी तब्बल ४३० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कला प्रकारात सहभागी होवून अद्भुत दाद मिळविली.
पार्थ सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,खरपुडी
दि.22/12/25 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धा पार्थ सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकवून यश मिळविले या सर्व अकरा विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली.
मत्स्योदरी विद्यालय मठपिंपळगाव ,अंबड
अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील मत्स्योदरी विद्यालयाच्या इयत्ता सहावीमधील विद्यार्थिनी कु. दिव्या सुभाष जिगे व कु. भैरवी दि पक जिगे या डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक परीक्षा २०२५-२६ च्या लेवल एकमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत.
मत्स्योदरी ज्ञानमंदिर प्राथमिक शाळा, अंबड
उत्तम विचार आणि चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी वाचन हा सर्वोत्तम मार्ग असून वाचनाची सवय जोपासण्यासाठी विद्याध्यर्थ्यांनी दररोज एक गोष्टीचे पुस्तक वाचावे, आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्या मित्रांना किंवा वर्गमित्रांना सांगावे, आपल्या घरी छोटेखानी वाचनालय तयार करावे, असे आवाहन मुख्याध्यापक लक्ष्मण कोळकर यांनी केले.
उत्तम विचार विकसित करण्यासाठी वाचन हा सर्वोत्तम मार्ग : कोळकर
जालना
अंकुशराव टोपे महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार वाघ याची १९ वर्षाखालील क्रिकेट संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली. महाराष्ट्राचा अंडर १९ संघ निवडण्यासाठी सर्वप्रथम जिल्हा पातळीवर आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून संघाने भरीव कामगिरी केली होती..