(M.A B.ED)
कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेबांनी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील मुलांना चांगले व दर्जेदार गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे म्हणून सन २००३ साली जालना शहरात ‘’मत्स्योदरी विद्यालय, जालना या नावाने शाळा सुरु केली. आज या शाळेत ४२५ विध्यार्थी शिक्षण घेत आहेत सदरील शाळेत ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची गरज लक्षात घेता फक्त सेमी इंग्रजी माध्यमातून मुलांना मोफत प्रवेश व दर्जेदार शिक्षण दिले जाते. शाळेचे वैशिष्टेय म्हणजे २०१५ पासून शाळा ही आधुनिक ई-लर्निंग डिजिटल शैक्षणिक साधनांचा वापर करून अध्यापनाचे कार्य करत आहे.शाळेतील वर्ग खोल्यात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे, साउंड प्रोजेक्टर, तथा इंटरअक्टीव बोर्ड चा दररोज वापर केला जातो. तसेच शाळेत सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, हार्मोनियम, तबला व बंड पथक आहे.
शाळेतील सर्व शिक्षकवर्ग अध्यापनाबरोबर क्रीडा,कला व सांस्कृतिक कार्यक्रमातून विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम, व स्पर्धा मध्ये विध्यार्थ्यांना सहभागी करून मार्गदर्शन करत आहे.त्यामुळे शाळेतील मुलांनी जिल्हा तथा विभागीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात विविध बक्षीस मिळवलेले आहे. जि.प. कडून राबविण्यात आलेल्या ‘ग्रंथ दिंडी’ उपक्रम सलग तीन वर्ष प्रथम व द्वितिय पारितोषिक शाळेने पटकावले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठी ‘नाट्याकुर’ सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून मानाची ढाळ सलग दोन वर्ष मिळवली आहे. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्यामुळे शाळा जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळवत आहे. राज्याचे मा. आरोग्ये मंत्री ना. श्री. राजेशभैय्या टोपे साहेब, सचिव श्रीमती मनीषाताई टोपे तसेच सहायक प्रशाकीय अधिकारी श्री. राहुल भालेकर यांच्या पाठपुराव्यामुळे व विशेष सहकार्यामुळे शाळेची वाटचाल प्रगती पथाकडे सुरु आहे.
The training course is dedicates to anyone passionate about the web and in need of improving their current online presence.
For registration questions please get in touch using the contact details below. For any questions use the form.
Copyright © 2025- All rights reserved