मुख्याध्यापक(बी.एस.सी, बी.एड.)
शाळेचे नाव:- मत्स्योदरी विद्यालय घु.हादगाव ता.अंबड अध्यक्ष- मा.राजेशभैय्या टोपे साहेब सचिव- मुख्याध्यापक शाळा मान्यता- एस.एस.एन/1093/3450/माशि-1दि.02.07.1993 खात्याची प्रथम मान्यता – जा.क्र.मावि3/1995/96/28764/67/विभागीय शिक्षण उपसंचालक कार्या.औ.बाद बिभाग औ.बाद दि.20/07/1993 एसएससी बोर्ड मान्यता(1)- क्र.औ.वि.मं/मान्यता/2012 दि.17.10.95 61.165 एसएससी बोर्ड मान्यता(3)- जा.क्र मा.वि.-3/06-07/21506/664 शि.उप.एस.स. औ.बाद दि.22.09.06-6103026
शाळेची स्थापना दि.20/07/1993 रोजी झाली.प्रथम 8 वी चावर्ग मान्य होता.सुरवातीला शाळा घुं.हादगाव येथे एका साध्या खोली मध्ये भरत असे.नंतर मा.कै.अंकुशरावजी टोपेसाहेब यांनी गावकर्यांना शाळेसाठी जमीन दानपत्र देण्याचे आव्हान केले.त्यांना गावातील काही जमीनदार लोकांनी सहकार्य करून शाळेसाठी 1 हेक्टर 97 आर जमीन मिळाली.त्याठिकाणी साधारण 4ते5 वर्ष पत्रेच्या शेडमध्ये शाळा भरत होती.नंतर पुन्हा मा.साहेबांनी गावकर्यांना आव्हान करून काही निधी गोळा करण्याचे केल्यामुळे गावकर्यांनी मोठा प्रतिसाद दिला गावकर्यांचा निधी व संस्थेचा निधी असे मिळून साधारण 2010 मध्ये जवळपास 50 लाखाची सुंदर इमारत उभी राहिली.आज शाळेमध्ये साधारण 18 लोकांचा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.शाळेची इमारत सुसज्ज असून एकूण 12 खोल्या,1 किचन शेड आहे. सर्व सोयीयुक्त स्वछता गृह आहेत.शाळेमध्ये आज रोजी परिसरातील 500 विद्यार्थी चांगल्या प्रतीचे शिक्षण घेत आहेत. शाळेमधून आतापर्यंत हजारो विद्यार्थी इयत्ता 10 वी पास झाले असून चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करत आहेत. मा.अध्यक्ष साहेबांच्या प्रयत्नाने शाळेमध्ये 3 प्रोजेक्टर,1 TV, 10 संगणक आहेत. शाळा पूर्ण डीजीटल आहे.विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण शाळेतील सर्व शिक्षकवृंद देत आहेत.शाळेमध्ये सर्व प्रकारचे शैक्षणिक उपक्रम होतात.त्यामध्ये विद्यार्थी सहभाग भरपूर असतो.शाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित होतात.तसेच सामन्य ज्ञान परीक्षा होतात.शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी खुले मैदान आहे.झाडी भरपूर आहे.मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो.अप्रगत मुलासाठी जास्तीचे तास घेऊन त्यांना प्रगत केले जाते.अनुपस्थित मुलांच्या पालकांना संपर्क करून अनुपस्थित चे प्रमाण नगण्य करण्यात येते.शाळेत पोषण आहाराची खिचडी दर्जेदार व चांगल्या प्रतीची असते. आज शाळा चांगल्या उंचीवर आहे.पंचसुत्री,त्रिसूत्री चे काटेकोरपणे पालन करण्यात येते.
The training course is dedicates to anyone passionate about the web and in need of improving their current online presence.
For registration questions please get in touch using the contact details below. For any questions use the form.
Copyright © 2025- All rights reserved