M.A.B.Sc.B.Ed.
"कर्मयोगी स्वर्गीय अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या विचारातून जालना जिल्ह्याचे शैक्षणिक मागासलेपण नाहीसे व्हावे या शुद्ध हेतूने शहाणे करून सोडावे सकळजन हे ब्रीदवाक्य घेऊन इ. स. 1974 -75 या वर्षी ‘मत्स्योदरी शिक्षण संस्थेची’ स्थापना केली. या संस्थेचे पहिले विद्यालय अंबड येथे ‘मत्स्योदरी विद्यालय अंबड’ या नावाने 1974 मध्ये वर्ग आठवी पासून सुरू झाले. सुरुवातीला एका वर्ग खोलीत वर्ग भरायचा त्यासाठी पाच कर्मचारी कार्यरत होते. तदनंतरच्या काळात शाळेचा विकास होताना नववी, दहावी, पाचवी, सहावी व सातवी असे वर्ग वाढत गेले वर्गवाढी बरोबरच गरीब शेतकऱ्यांची मुले मुली शिकली पाहिजे हा शुद्ध हेतू माननीय अध्यक्ष साहेबांच्या मनात होता. पुढे या शैक्षणिक कार्यात मा. मंत्री राजेश भैय्या टोपे साहेब व आदरणीय मनीषाताई टोपे यांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. मत्स्योदरी विद्यालय अंबडच्या विकासासाठी सतत मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे पवित्र काम त्यांनी केले आहे व सातत्याने करत आहेत मत्स्योदरी विद्यालय अंबड या विद्यालयात वर्ग वाढीबरोबरच विद्यार्थी संख्याही वाढत गेली सुरुवातीला 35 विद्यार्थी होते. आज या विद्यालयात 3226 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका वर्ग खोलीपासून सुरू झालेले विद्यालय 42 वर्ग खोल्यात व दोन सत्रात चालते शालेय इमारत अतिशय भव्य व देखणी तयार झालेली आहे. इमारत बांधकामासाठी आमदार राजेश भैय्या टोपे साहेबांचे खूप मोठे योगदान मिळाले आहे. पाच कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेल्या या विद्यालयात आज 83 कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या दूरदृष्टीतून ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी लोकवर्गणीतून वस्तीगृह सुरू करण्यात आले. या वस्तीगृहात आज खेड्यापाड्यातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्या वाढीबरोबरच गुणवत्ता वाढीवरही भर दिला जातो. दहावी बोर्ड परीक्षेत या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी जिल्ह्यातून प्रथम आलेले आहेत. निकालाची ही परंपरा सतत वाढलेलीच आहे. या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आज जिल्हाधिकारी, न्यायाधीश, वकील, लष्करी अधिकारी, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व इतर सर्व क्षेत्रातील सेवेमध्ये कार्यरत आहेत. मा. प्रशासकीय अधिकारी डॉक्टर बी आर गायकवाड सर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली पंचसूत्रीचा प्रभावीपणे शाळा वापर करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांसाठी नियमित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. विविध शालेयतर परीक्षांचे आयोजन करण्यात येतात व प्रत्येक महिना अखेर सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे पाणीशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुलांबरोबरच मुलीही मोठ्या प्रमाणात या विद्यालयात शिक्षण घेत आहे त्यांना निकोप असे वातावरण येथे उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी दरवर्षी विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. अटल टिंकरिंग लॅब यासाठी केंद्र सरकारची मदत मिळते त्याची स्थापना माननीय भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात करण्यात आलेली आहे. विद्यार्थी त्याचा वारंवार वापर करतात. त्याचबरोबर डिजिटल बोर्ड चा वापर करून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ज्ञानाची ओळख करून दिली जाते.संगणक युगासाठी विद्यार्थी तयार करण्यासाठी सुसज्ज असे संगणक कक्ष तयार आहे. सर्व सोयी असलेले ग्रंथालय विद्यालयात तयार होत आहे."
The training course is dedicates to anyone passionate about the web and in need of improving their current online presence.
For registration questions please get in touch using the contact details below. For any questions use the form.
Copyright © 2025 - All rights reserved