एम.ए.बी.एड
मत्स्योदरी शिक्षण संस्था जालना संचलित मत्स्योदरी प्रशाला म. चिंचोली ता.घनसावंगी जि.जालना या ग्रामीण भागातील शाळेत संस्थेचे अध्यक्ष मा आमदार श्री.राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंचसूत्री व त्रिसूत्री धोरण शाळेत राबवले जाते.विद्याथी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास होण्यासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम व प्रकल्प प्रामाणिक पणे राबवले जातात.गुणवत्ता हीच उत्कृष्टता साधण्याची गुरुकिल्ली आहे. हे संस्थेचे धोरण आहे.ग्रामीण भागातील मुले व मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण देणारे ,विद्यार्थाच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे , विद्यार्थांना संस्कारक्षम शिक्षण देवून स्वावलंबी बनवणारे,आदर्श विद्यार्थी घडवणारे एक केंद्र म्हणून हि एक ग्रामीण भागातील उत्कृष्ट शाळा आहे. गुणवत्तेच्या बाबतीत कोठेही तडजोड केली जात नाही संस्थेने ठरवून दिलेले उपक्रम, प्रकल्प ,शिस्त याचे तंतोतंत पालन या शाळेमध्ये केले जाते या शाळेमध्ये कार्यरत असणारे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी खूप परिश्रम घेतात मत्स्योदरी शिक्षण संस्थेची ग्रामीण भागातील हि एक उत्कृष्ट गुणवत्ता जोपासणारी शाळा आहे. त्यामुळे या शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी व पालक यांची नेहमी धडपड चालू असते तालुक्यामध्ये हि अव्वल दर्ज्याची व कडक शिक्षण देणारी शाळा म्हणून या शाळेची गणना होते या शाळेला मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार राजेश भैय्या टोपे साहेब यांनी शाळेसाठी भव्य दिव्य अशी इमारत बांधकाम केलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे क्रीडांगण असून क्रीडा क्षेत्रात या शाळेतून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर यश संपादन केलेले आहे. शालेय परिसरामध्ये संस्थेच्या मार्गदर्शनानुसार विविध एकूण 900 वृक्षांची लागवड केलेली असून शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सर्व वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात सर्व परिसर खूप सुंदर व स्वच्छ आहे शासणाच्या आरटीई नियमांचे व निकषांचे तंतोतंत पालन करणारी ग्रामीण भागातील शाळा आहे.शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांना जे शिक्षण व सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा या शाळेमध्ये उपलब्ध आहेत. शाळेमध्ये डीजीटल क्लासेस घेण्यासाठी मा. आमदार राजेश भैय्या टोपे साहेब यांनी शाळेसाठी एकूण 03 डिजिटल बोर्ड उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी 02 वाटर फिल्टर उपलब्ध करून दिलेले आहेत. मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी कै. अंकुशरावजी टोपे साहेब यांना अभिप्रेत असणारी ग्रामीण भागातील शाळा गुणवत्ता जोपासणारी शाळा म्हणून या शाखेकडे पहिले जाते.
The training course is dedicates to anyone passionate about the web and in need of improving their current online presence.
For registration questions please get in touch using the contact details below. For any questions use the form.
Copyright © 2025- All rights reserved