M.A.(HIS.,POL.SCI) D.ED,B.ED
"आमच्या शाळेचे नाव कै.दत्तासाहेब देशमुख प्राथमिक शाळा घनसावंगी आहे.शाळेचा यु-डायस नंबर 27180401803 हा आहे .शाळेचीस्थापना १९९४मध्ये झाली.अगोदर या शाळेचे नाव मत्स्योदरी प्राथमिक शाळा घनसावंगी असे होते.ही शाळा अगोदर देशमुख गल्ली या ठिकाणी एका जुन्या वाड्यात भरत होती .शाळेला १००% अनुदान २००४ मध्ये प्राप्त झाले.शाळेसाठी गावात जागा कमी पडत होती त्या मुळे घनसावंगी येथील दानशूर व्यक्ती श्री.नेताजीराव देशमुख यांनी शाळेसाठी मेन रोड वर २ एक्कर जागा दान म्हणून दिली .त्या बदल्यात शाळेला त्यांच्या वडिलाचे नाव कै.दत्तासाहेब देशमुख प्राथमिक शाळा घनसावंगी असे करावे अशी त्यांची अट होती त्या मुळे सन२००८ साली शाळेचे नाव बदलून कै.दत्तासाहेब देशमुख प्राथमिक शाळा घनसावंगी असे करण्यात यावे असा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यातआला व त्यास मंजुरी मिळाली व २००८मध्ये शाळेचेनाव अधिकृत कै.दत्तासाहेब देशमुख प्राथमिक शाळा घनसावंगी असे झाले.शाळेत 1ली ते4 थी पर्यंत वर्ग असून संचमान्यतेनुसार मान्यपदे 4 असून भरलेली पदे 4 आहेत.रिक्त पद एकही नाही.सन२०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून पालकांच्या मागणी नुसार सेमी माध्यम सुरु करण्यात आले आहे .आज रोजी शाळेची पटसंख्या २२० आहे. शाळेमध्ये विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या कडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते .त्याची सुरुवात परिपाठा पासून होते.परिपाठात जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्या जाते.दररोज सुविचार,दिनविशेष ,बातम्या,सामान्यज्ञान,बोधकथा,देशभक्तीपर गीते,योगासने,व विविध खेळाचे प्रकार शिकवले जातात .विध्यार्थ्याच्या स्वच्छतेकडे व आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्या जाते.शाळेत प्रथोमपचार पेटी असून वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते . विध्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तके नियमित वाचनासाठी दिले जातात .शाळेत ग्रंथ प्रदर्शन भरवले जाते .दर गुरुवारी शाळेत संस्कार दिन साजरा केला जातो त्या अंतर्गत चांगल्या सवयी कशा अंगी बाळगाव्यात या विषयी मार्गदर्शन करण्यात येते .आई वडिलांचे दर्शन दररोज घेऊन येण्यास सांगितले जाते .शाळेत प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्डावर शैक्षणिक साहित्य लावण्यात आलेले आहे.तसेच ई-लर्निंग सुविधा मिळण्यासाठी स्मार्ट बोर्ड,टी.व्ही उललब्ध आहे .सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपला विध्यार्थी कुठे ही कमो पडू नये म्हणून शाळेत सामान्य ज्ञानावर आधारित सामान्यज्ञान परीक्षा घेतली जाते.गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विध्यार्थ्यांना मा.अध्यक्ष साहेब बक्षीस देऊन गौरव करतात. दर शनिवारी शाळेत योगासने व कवायती घेतल्या जातात .तसेच नवीन उपक्रम आज आता ताबडतोब या अंतर्गत एका अक्षरापासून १० मिनिटात जास्तीत जास्त अचूक शब्द जो लिहील त्याला लगेच छोटेसे बक्षीश देण्यात येते .या मुळे विध्यार्थ्याच्या शब्दसंपत्ती मध्ये भर पडते .सहशालेय उपक्रम अंतर्गत वनभोजन केले जाते .जवळच एखाद्या मंदिर परिसरात किंवा शेतात विध्यार्थी नेले जातात .अगोदर साफसफाई केली जाते नंतर विविध गुण दर्शन अंतर्गत विविध गप्पा,गाणी ,गोष्टी,कविता,जोक,नाटक,नृत्य सादरीकरण केल्या जाते व नंतर वनभोजनाचा आनंद घेतला जातो. दरवर्षी शाळेची शैक्षणिक सहल आयोजित केली जाते .सहलीवरून आल्यानंतर अहवाल लेखन घेतल्या जाते .तसेच व्यःहार ज्ञान होण्यासाठी आनंदनगरी कार्यक्रम घेतला जातो .विविध पदार्थ विध्यार्थी बनवून आणतात व स्वतः विकतात .या वरुन नफा तोटा कसा होतो हे समजते ."
The training course is dedicates to anyone passionate about the web and in need of improving their current online presence.
For registration questions please get in touch using the contact details below. For any questions use the form.
Copyright © 2020 Inovatik - All rights reserved