मुख्याध्यापक(एम.ए.,बि.पी.एड.)
मत्स्योदरी विद्यालय मठपिंपळगाव नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस मठपिंपळगाव परिसरातील विद्यार्थांना माध्यमिक शिक्षणासाठी अंबड, जालना किंवा इतर शहरात जावे लागत असे. परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी गावकरी व परिसरातील पालकांच्या मागणीनुसार जालना जिल्हयाचे भाग्यविधाते शिक्षण व सहकार महर्षी माजी खासदार कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांनी सन १९९३-९४ या शैक्षणिक वर्षात २ जुलै १९९३ रोजी मत्स्योदरी विद्यालय मठपिंपळगाव (८ वी ते १० वी) या शाळेची स्थापना केली. या शाळेतून १९९६ ला इयत्ता १० वी ची पहिली बँच बाहेर पडली. त्यानंतर सन २००० पासून पाचवीच्या वर्गाची सुरुवात झाली व ही शाळा ५ वी ते १० वी अशी झाली आहे.सन २००४ पासून ते आजपर्यंत बहुतांश वेळा शाळेचा इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल १०० % लागलेला आहे. या साठी शाळेत वर्षभर ज्यादा तासिका, रात्र अभ्यासिका व विविध प्रकारचे गेस्ट लेक्चर्स इ.गोष्टीचे काटेकोरपणे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात एकूण ४२१ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख स्थापनेपासून सतत उंचावतच आहे. शाळेला आत्तापर्यंत शासनाच्या शाळा सिध्दी सर्वेक्षणात ‘अ’ श्रेणी प्राप्त झालेली आहे. हरितसेना विभागाकडून शाळेला ‘पंचतारांकित शाळा’ हा सन्मान देखील मिळालेला आहे. बाहेर गावच्या मुलींना शाळेत येण्या-जाण्यासाठी बस-सेवा व सायकल वाटप सारखे उपक्रम राबवले जातात.
शाळेतील अनेक माजी विद्यार्थी कला, क्रीडा, वाणिज्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, सैन्यदल व चार्टड अकौंटंट अशा विविध क्षेत्रात सामाविष्ट होवून देशसेवा करत आहेत. अलीकडच्या काळात २०२१-२२ पासून इंग्रजीचे व्यवहारातील वाढते महत्व लक्षात घेता शालेय व्यवस्थापनाने महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री तथा विद्यमान आमदार व मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.राजेशभैय्या टोपेसाहेब यांच्या सूचनेनुसार इयत्ता पाचवी पासून सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरात विध्यार्थांचा शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेत नियमितपणे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तसेच विज्ञान प्रदर्शन, गणित दिवस, स्काऊट गाईड, वादविवाद, वक्तृत्व व विविध तालुका स्तरीय, जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाच्या विविध प्रकारात विद्यार्थांना सहभागी होण्याची संधी निर्माण करून दिल्या जाते. विध्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक व शारीरिक विकासासाठी शाळेत नियमितपणे मुख्याध्यापक श्री. राहुल भालेकर सर व सर्व शिक्षक नेहमीच कार्यतत्पर असतात.
The training course is dedicates to anyone passionate about the web and in need of improving their current online presence.
For registration questions please get in touch using the contact details below. For any questions use the form.
Copyright © 2025- All rights reserved